
Government Subsidy For Farming Related Business in @ LOCATION

अणदूर : जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अणदूर येथे आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मार्गदर्शक व प्रोजेक्ट कन्सल्टंट पी. टी. काळे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत पी. टी. काळे यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार, नवीन उद्योग उभारणी, केंद्र व राज्य शासनाच्या उद्योगविषयक योजना, बँक कर्ज व अर्थसहाय्य, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची पद्धत, उद्योग नोंदणी, मार्केटिंग, व्यवसाय नियोजन तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींपुरते मर्यादित न राहता स्वतःचा उद्योग उभारण्याचा विचार करावा, स्थानिक उपलब्ध साधनसंपत्ती व कृषी उत्पादनांवर आधारित उद्योगांना प्राधान्य द्यावे आणि शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन पी. टी. काळे यांनी केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध उद्योग संधी, प्रकल्पासाठी लागणारे भांडवल, अनुदान योजना, बँक अर्थसहाय्य आणि उद्योग सुरू करताना घ्यावयाची काळजी याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना पी. टी. काळे यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. उद्योजकता क्षेत्रातील मार्गदर्शन व योगदानाबद्दल प्रमुख मार्गदर्शक तथा प्रोजेक्ट कन्सल्टंट, महाराष्ट्र राज्य, पी. टी. काळे यांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
